जळगावात हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय : तिघांना अटक

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


जळगाव : शहरातील जळगाव-औरंगाबाद रोडवरील अमरनाथ हॉटेलात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार सोमवार, ३१ जानेवारी रेाजी सायंकाळी उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यात हॉटेल मालकाचा समावेश आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या अमरनाथ हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, आशा पांचाळ, सुनिल पाटील, किरण धमके, चंद्रकांत चिकटे, संतोष जाधव, रविंद्र सुरळकर, रविंद्र कारंकाळ, मिलींद पाटील यांनी सोमवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अमरनाथ हॉटेलमध्ये छापा टाकला. या कारवाईत राजेश मिठाराम ठोंबरे (४९, रा. जुना खेडी रोड, जळगाव), विकास रमेश सोनवणे (२७, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्यासह दोन महिलांसोबत आढळून आले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शंकर दुलाराम महाजन (४१, रा. हनुमान नगर, जळगाव), ग्राहक राजेश मिठाराम ठोंबरे आणि विकास रमेश सोनवणे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !