चाळीसगावात माजी सैनिकांकडे धाडसी घरफोडी ; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास
चाळीसगाव : शहरातील इच्छादेवी नगरातील माजी सैनिक संजय राठोड यांचे बंद घरांचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटातून तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
घरफोडीमुळे उडाली खळबळ
चाळीसगाव शहरातील इच्छादेवी नगरातील माजी सैनिक संजय प्रताप राठोड (36) यांच्या बंद घरांचे कुलूप व कडीकोंडा तोडून अज्ञाताने घरातील लाकडी कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले 1 लाख 20 हजार किंमतीचे 40 ग्रॅम वजनाची मंगलपोत, 45 हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅमची सोन्याची शॉर्ट पोत, 45 हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅमची सोन्याची झुंबर, 9 हजार रुपये किंमतीची 3 ग्रॅमची सोन्याची झुंबर, 15 हजार रुपये किंमतीच्या 5 ग्रॅमचे कानातले वेल, 36 हजार रुपये किंमतीच्या 12 ग्रॅमची एक सोन्याची नेकलेस, 30 हजार रुपये किंमतीच्या 60 भार असलेले दोन चांदीचे हातातले कडे व 2 हजार पाचशे रुपये किंमतीचे 5 भारचे ब्रेसलेट असे एकूण 3 लाख 2 हजार पाचशे रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. 29 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता ते 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली आहे.





चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा
माजी सैनिक संजय राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहा.निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.
