कर्जाच्या बहाण्याने जळगावातील दूध व्यावसायिकाची 50 हजारात फसवणूक


जळगाव : शहरातील चैतन्य नगरातील दूध व्यावसायीकाला कर्जप्रकरण करून देण्याचे सांगत एकाने 50 हजार रुपयांत गंडवले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शेखर वाल्मीक वाघ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, चैतन्य नगरात कुणाल शांताराम मेतकर (31) हे वास्तव्यास असून त्यांचा दूध व्यवसाय आहे. त्यांना शेखर वाल्मीक वाघ याने कर्जप्रकरण करून देतो, असे सांगत मेतकर यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. 5 नोव्हेंबर 2020 ते 6 फेब्रुवारी 2021 दरम्यान ही घटना घडली. कुणाल मेतकर यांनी वाघ याच्याकडे कर्ज प्रकरणाबाबत पाठपुरावा केला तसेच कर्ज प्रकरणासाठी दिलेले कागदपत्र व पैसे परत मागितले मात्र शेखर वाघ याने कागदपत्र परत दिले नाहीत. दिलेल्या पैशांपैकी केवळ 50 हजार रुपये परत केले. उर्वरीत 50 हजार रुपये मागितले असता वाघ याने मी कुणाल मेतकर यांना तुझ्याकडून जे होईल ते करून घे अशी धमकी दिली.






जिल्हा पेठ पोलिसात अखेर तक्रार
वर्षभरानंतरही उर्वरीत 50 हजार रुपये मिळत नसल्याने अखेर मंगळवार 1 फेब्रुवार रोजी कुणाल मेतकर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून शेखर वाल्मीक वाघ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार मनोज पवार हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !