शेतात गुरे चराई केल्याने पिकांचे नुकसान : गुरांख्यासह 14 जणांविरोधात पोलिसात गुन्हा
जळगाव : तालुक्यातील लमांजन येथे शेतात गुरे चारून पिकांचे नुकसान करणार्या गुराख्यांसह 14 जणांविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतात गुरे चराईने पिकांचे नुकसान
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील योगेश एकनाथ सोनवणे (43) यांची लमांजन गावात शेती आहे. 31 जानेवारी रोजी काही गुराख्यांनी सोनवणे यांच्या शेतात गुरे चरायला सोडली. या गुरांमुळे शेतातील लिंबू व हरभरा या पिकांचे नुकसान झाले. त्याचा जाब विचारला असता संबधितांनी योगेश सोनवणे यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.





यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
योगेश सोनवणे यांनी या प्रकरणी मंगळवारी सुधाकर युवराज पाटील, विठ्ठल वाल्मिक पाटील, अनिल भीमराव पाटील, दीपक मधुकर पाटील, भैय्या भीमराव पाटील, बापू भीमराव पाटील , अशोक रामचंद्र पाटील यांच्यासह इतर 7 जणांविरूध्द एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहेत.
