जळगावात अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला


जळगाव : शहरातील जयकिसनवाडी येथील मुख्य रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मयत स्थितीत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

झोपलेल्या स्थितीत मयत आढळला
हरातील जयकिसनवाडी परिसरात मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका 45 वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. येथील बाकावर झोपलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान थंडीमुळे भिक्क्षुकाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज केला जात आहे. शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक धनराज निकुंभ करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !