जळगावातून चोरट्यांनी मंगळसूत्र जबरीने लांबवले


जळगाव : शहरातील आकाशवाणी चौक ते विद्यूत कॉलनी दरम्यान 72 वर्षीय वयोवृध्दाच्या खिश्यातून 15 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चार जणांनी जबरी हिसकावून लांबविले. ही घटना बुधवार, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
शेख जलील शेख इब्राहिम (72, रा.पंचशील नगर, तांबापूरा, जळगाव) हे कामाच्या निमित्ताने बुधवार, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात आले होते. त्यांचे काम आटोपून ते विद्यूत कॉलनीकडे जात असतांना अज्ञात चार जण त्यांच्या समोर उभे राहिले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या खिश्यातील 15 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र जबरी हिसकावून लांबविले. त्यांनी आरडाओरड केली परंतू तोपर्यंत अज्ञात चार चोरटे पसार झाले. शेख जलील यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी 8 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !