कोरोना : 281 रुग्णांची कोरोनावर मात : जळगाव जिल्ह्यात नव्याने आढळले 160 रुग्ण


जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना सुसाट वेगाने पसरत असून दिवसागणिक वाढणार्‍या रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढतच आहे. जिल्ह्यात गुरूवार, 3 फेब्रुवारी रोजी एकाच दिवसात तब्बल 160 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत 2587रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 587 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 50 हजार 982 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 46 हजार 412 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. गुरुवारी 281 रुग्णांनी कोरोनावर मात केली.






या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 34
जळगाव ग्रामीण 07
भुसावळ 24
अमळनेर 04
चोपडा 24
पाचोरा 02
भडगाव 01
धरणगाव 06
यावल 00
एरंडोल 01
जामनेर 28
रावेर 02
पारोळा 01
चाळीसगाव 08
मुक्ताईनगर 13
बोदवड 01
अन्य जिल्हा 04


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !