आयजींच्या पथकाची मोठी कारवाई : 45 लाखांचा गुटखा जप्त
जळगाव : नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या नाशिक जिल्ह्यातील देवळा ते मालेगाव मार्गावर 45 लाखांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली. आरोपी वाहन चालकाला अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक बापू रोहम, सहा.निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक फौजदार बशिर तडवी, सचिन धारणकर, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, सुरेश टोगांरे यांनी देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळा ते मालेगाव मार्गावर आयशर (एम.एच.15 जी.व्ही. 7623) ची तपासणी केल्यानंतर त्यातून विमल गुटख्याने भरलेली 113 पोती जप्त करण्यात आली. या गुटख्याची किंमत 45 लाख 26 हजार 315 रुपये असून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत 12 लाख रुपये आहे. आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईलही जप्त करण्यात आला.





चौघे आरोपी पसार
आरोपी चालक अतुल अशोक शिंदे (रा.नाशिक) याला अटक करण्यात आली आहे. गोदान मालक वाजदा (गुजराथ), खरेदी करणारे राजु कोठावदे ( रा.मालेगाव), सुनील अमृतकर ( रा.नाशिक), माँन्टी (रा.नाशिक ) हे 4 आरोपी मात्र पसार आहेत . या आरोपींच्या विरोधात देवळा पोलिसस ठाण्यात भादंवि कलम 272, 273, 328,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
