दापोर्‍यातील तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या


जळगाव : तालुक्यातील दापोरा येथील 30 वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली. ही घटना शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ गुरूवार, 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विनोद सखाराम पाटील (30, रा. दापोरा, ता.जि.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
जळगाव तालुक्यातील दापोरा येथील रहिवाशी विनोद पाटील हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार, 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान अंतरावर खांबा क्रमांक 406/27-1 दरम्यान युवकाने डाऊनलाईनवर जाणा-या मालगाडी समोर स्वताला झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. दापोरा येथील पोलीस पाटील जितेंद्र गवंदे यांना खबर मिळाल्यावरून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत तालुका पोलीस ठाण्यात खबर दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली. पुढील तपास तालुका पोलिस करीत आहे. मयत हा अविवाहित असून आपल्या आई व भाऊसोबत वास्तव्यास होता.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !