जळगावात वृद्धाला लुटले : त्रिकुट जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : प्रवासी वृद्धाला रीक्षात बसवल्यानंतर त्याच्याकडील मंगळसूत्र बळजबरीने हिसकावण्यात आल्याची घटना शहरात घडली होती. या प्रकरणी जळगावच्या रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याची उकल जळगाव गुन्हे शाखेने केला असून त्रिकुटला बेड्या ठोकल्या आहेत. मोसीन खान उर्फ शेमड्या नुरखान पठाण (28, रा.पिंप्राळा हुडको), शाहरुख शेख रफीक (20, रा.पिंप्राळा हुडको) व समाधान सुमेरसिंग पाटील (33, रा.खंडेराव नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

वृद्धाचे लांबवले होते मंगळसूत्र
बुधवार, 2 रोजी शेख जलील शेख ईब्राहीम (72, रा.तांबापुरा) हे धुळे जाण्यासाठी आकाशवाणी चौकात थांबलेले असता एका ऑटो रीक्षा चालकाने त्यांना कोठे जाता आहे अशी चौकशी केली. नंतर त्याने आम्हीसुध्दा धुळे येथे जात आहोत असे सांगुन फिर्यादीस रीक्षात बसवुन घेतले. धुळे रोडने पुढे गेल्यावर रिक्षात पूर्वीपासुन बसलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन घेत फिर्यादीस उतरुन दिले आणि रीक्षासह पळ काढला होता. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.






गुन्हे शाखेने केली गुन्ह्याची उकल
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनश देवरे, चालक भारत पाटील यांच्या पथकाने या आरोपीचा शोध घेतला. मोसीन खान उर्फ शेमड्या नुरखान पठाण (28, रा.पिंप्राळा हुडको), शाहरुख शेख रफीक (20, रा. पिंप्राळा हुडको), समाधान सुमेरसिंग पाटील ( 33 रा. खंडेराव नगर) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी साथीदार सद्दाम उर्फ पिके पिंजारी (रा.खंडेराव नगर ) याच्यासह गुन्हा केल्याची माहिती दिली त्यांनी गुन्हयात वापरलेले ऑटो रीक्षा आरोपी समाधान पाटील याच्याकडून हस्तगत करण्यात आली.

आरोपी रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात
या आरोपींना रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. मोसीन खान उर्फ शेमड्या पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून अनेक गुन्हे त्याच्याविरोधात दाखल आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !