जळगावच्या विवाहितेचा पाच लाखासाठी छळ


जळगाव : घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह सासरकडील चार जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात (shanipeth police station) गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह चौघांविरोधात गुन्हा
ज्ञानदेव नगर येथील मोहिनी बेंडाळे (mohini bendale) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील खेडी येथील तुषार ज्ञानदेव बेंडाळे यांच्यासोबत झाला. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासरच्यांकडून विवाहिता मोहिनीने तिच्या माहेरून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावे, अशी मागणी करण्यात आली. याच कारणावरून तिला पतीने मारहाण केली तर सासरच्या मंडळींनी उलट सुलट बोलून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. अशा आशयाच्या मोहिनी बेंडाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती तुषार ज्ञानदेव बेंडाळे , सासरे ज्ञानदेव नामदेव बेंडाळे , नणंद कुमुदिनी जगदीश कोल्हे (सर्व रा. खेडी ता. जळगाव) व दीर प्रवीण ज्ञानदेव बेंडाळे (रा. एमआयडीसी जळगाव) या चार जणांविरुध्द शनिपेठ पोलिसात (shanipeth police station) गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश युवराज पाटील हे करीत आहेत.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !