धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृध्दाचा मृत्यू
जळगाव : शहरातील दिनकर नगरात राहणारे ७२ वर्षीय वयोवृध्दाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेश दयाराम बाविस्कर (72, रा. दिनकर नगर, मोहन टॉकीजवळ, जळगाव) असे मयत वृध्द व्यक्तीचे नाव आहे.
रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू
सुरेश बाविस्कर हे पत्नी, तीन मुले यांच्यासह शहरातील दिनकर नगरातील मोहन टॉकीज येथे वास्तव्याला आहे. रविवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी बाहेर फिरून येतो असे सांगून ते घराबाहेर पडले. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास आसोदा रेल्वे गेट जवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई, तीन मुले ज्ञानेश्वर, गणेश आणि संतोष ही तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परीवार आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.





