अमळनेर शहरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


 

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला अमळनेर शहरातून फूस लावून पळवले






अमळनेर : पुणे जिल्ह्यातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अमळनेर शहरातून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी एकाविरोधात अमळनेर पोलिसस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेर पोलिसात गुन्हा
पुणे जिल्ह्यात एका गावात 17 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अमळनेर येथे तिचे बारावीची परीक्षा असल्याने मुलगी ही आई भाऊसह अमळनेर येथे मामांकडे आली होती. रविवार, 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे येथील राहणारा रावसोहब पांडूरंग साळुंखे याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत पीडीत मुलीच्या आईने अमळनेर पोलसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी रावसाहेब पांडूरंग साळुंखे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील हे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !