शार्ट सर्कीटमुळे ऊसाला आग : कलाली शिवारातील घटना


अमळनेर : तालुक्यातील कलाली येथील शेतात इलेक्ट्रीक तारांच्या झालेल्या शार्टसर्कीटमुळे ऊसासह ठिंबक नळ्या जळून खाक झाल्या. या घटनेत सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले. याबाबत मारवड पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

मारवड पोलिसात नोंद
प्रकाश धनसिंग पाटील (52, रा.कलाली, ता.अमळनेर) यांचे कलाली शिवारातील गट नंबर 60/2/अ मध्ये शेत आहे. त्यांनी शेतात ऊसाची लागवड केली होती. शनिवार 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या ताराच्या शार्टसर्कीटमुळे ऊसाला आग लागली. या आगीत शेतातील ऊस आणि ठिंबक नळ्या जळून खाक झाले आहे. यात सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले. आग लागताच गावातील पद्माकर दत्तात्रय पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेचा अग्नीशमन बंब बोलाविला व आग विझविण्यात आली. या प्रकरणी प्रकाश पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली.पुढील तपास हवालदार संजय पाटील करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !