दुचाकी चोरटा रामानंद नगर पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : शहरातील पिंप्राळा बाजारपट्ट्यातून दुचाकी लांबविल्याची घटना घडली होती. दरम्यान, दुचाकी चोरटा हा याच परिसरातील एका हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. किशोर दत्तात्रय चौधरी (42, रा.विद्या कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

रामानंदनगर पोलिसात दाखल होता गुन्हा
शहरातील चंदू अण्णानगरातील रहिवासी धनराज लंजी पाटील हे खाजगी नोकरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांची दुचाकी (एम.एच.19 सी.जी.1249) 21 डिसेंबर रोजी पिंप्राळा बाजारपट्टा येथे हॉटेल आदर्शजवळून अज्ञात चोरट्याने लांबविली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.






गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुशिल चौधरी व अजित पाटील हे गस्तीवर असतांना त्यांना याच परीसरातून चोरी गेलेली दुचाकी एका हॉटेलबाहेर लावलेली दिसून आली. त्यांनी काही वेळ याठिकाणी थांबले असता त्यांना किशोर दत्तात्रय चौधरी (42, रा.विद्या कॉलनी) ती दुचाकी घेवून जात असल्याचे दिसताच त्यांनी चोरट्याच्या मुसक्या आवळून पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !