चाळीसगावात प्रवाशाचे पाकिट लांबवले : तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
चाळीसगाव : प्रवाशाचे पाकिट लांबवणार्या तिघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. रहेमत खान अशरफ खान (40, बाबा चौक, हैदरपुरा, अमरावती), गफ्फार खान रहेमान खान (48, लालखडी रोड, पन्नीपुरा, अमरावती) सय्यद सलीम सय्यद हनिफ (33, पठाण चौक, छाया नगर, अमरावती) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
प्रवाशाचे लांबवले पाकिट
तक्रारदार अभिमान त्र्यंबक पवार (64, स्वामी समर्थ अपार्टमेंट, फ्लॅट नं. 6 कुर्डुकर नगर, न.पा. गार्डन जवळ , श्रीश्री रविशंकर मार्ग , आयनॉक्स सिनेमाच्या पाठीमागे, वडाळा शिवार, नाशिक, ह.मु.न्हावे, ता.चाळीसगाव) हे सोमवार, 7 रोजी पत्नीला सोडण्यासाठी बसस्थानकात आल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे पाकिट लांबवले होते. त्यात नऊ हजारांची रोकड तसेच ड्रायव्हींग लायसन्स व अन्य कागदपत्रे होती. या प्रकरणी त्यांनी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.





यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हवालदार संदीप तहसीलदार, नाईक विनोद भोई तसेच पोलीस मित्र सुहास राजेंद्र जगताप (रा.भोरस खुर्द, ता.चाळीसगाव) यांनी आरोपींना गोपनीय माहितीच्या आधारावरून अटक केली. तपास हवालदार संदीप तहसीलदार व विनोद भोई करीत आहेत.
