पाचोरा तालुका हादरला : चुलत मामेभावाकडून तरूणीवर अत्याचार


पाचोरा : तालुक्यातील एका 19 वर्षीय तरूणीवर नात्याने चुलत मामे भाऊ असलेल्या संशयीताने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

अत्याचार करीत व्हिडिओ केला प्रसारीत
19 वर्षीय तरूणीचा चुलत मामे भाऊ नितीन प्रल्हाद अहिरे याने मैत्री करीत पीडीतेच्या घरी तसेच फर्दापूर येथील लॉजवर वेळोवेळी अत्याचार केला. संशयिताने अत्याचार केल्याची व्हिडीओ काढून तिला दाखवत पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्यासोबत केलेले अत्याचाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर मित्रांना प्रसारीत केले. पीडीत तरूणीच्या नातेवाईकांनी याचा जाब विचारला असता त्यांनी जीव ेठार मारण्याची धमकी देण्यात आली. पीडीतेसह नातेवाईकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने आरोपी नितीन प्रल्हाद अहिरे, चुलत मामा प्रल्हाद दशथ अहिरे आणि चुलत मामी यांच्याविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !