एकाच दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू : जिल्ह्यात आढळले 53 रुग्ण


जळगाव : जळगाव जिल्ह्यात जिल्ह्यात मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 53 रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या घटल्याने समाधान व्यक्त होत असून एकाच दिवसात 409 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर एकाच दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

एकाच दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 590 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 51 हजार 357 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 47 हजार 746 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर मंगळवारी 409 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, गेल्या 24 तासात भुसावळ तालुक्यातील 73 वर्षीय स्त्री रुग्णासह जळगाव शहरातील 54 वर्षीय पुरूष रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला.






या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 12
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 01
अमळनेर 00
चोपडा 00
पाचोरा 12
भडगाव 00
धरणगाव 01
यावल 18
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 02
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 05
बोदवड 00
अन्य जिल्हा 00


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !