कोरोना रुग्णसंख्या घटली : जळगाव जिल्ह्यात नव्याने आढळले 23 रुग्ण


जळगाव : जळगाव जिल्ह्यात जिल्ह्यात बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 23 रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या घटल्याने समाधान व्यक्त होत असून एकाच दिवसात 193 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आतापर्यंत 2590 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 590 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 51 हजार 380 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 47 हजार 939 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर बुधवारी 193 रुग्णांनी कोरोनावर मात केली.






या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 04
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 03
अमळनेर 00
चोपडा 12
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 01
रावेर 00
पारोळा 02
चाळीसगाव 01
मुक्ताईनगर 00
बोदवड 01
अन्य जिल्हा 01


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !