क्रुझरच्या धडकेत निंबोलच्या 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रावेर : भरधाव क्रुझरने धडक मारल्याने नवीन निंबोल येथील 60 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार, 10 रोजी दुपारी घडली. या अपघातात रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. राजाराम धनु धनगर (60, नवीन निंबोल) असे मयत वृद्धाचे नाव आहे. राजाराम धनगर हे पातोंडी मार्गे रावेरकडे येत असतांना क्रुझर गाडीने जोरदार धडक मारल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी क्रुझर गाडी चालकाविरुध्दात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


