जळगाव विद्यापीठ अंतर्गत येणार्या महाविद्यालयात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करावी
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत येणार्या सर्वं महाविद्यालयात अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी, अशी मागणी अॅड.अभिजीत रंधे यांच्यासह विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतांना महाराष्ट्र स्टुडेंट युनियनचे विभाग प्रमुख अॅड.अभिजीत जितेंद्र रंधे, अॅड.निशांत शिंपी,
अॅड.फरहान खान, अॅड.अर्जुन खैरनार, अॅड.दीपक सोनवणे, केतकी सोनवणे, चेतन चौधरी व इतर मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.





