जळगावात सोन्यासह चांदीला पुन्हा झळाळी : जाणून घ्या नेमके दर


जळगाव : सुवर्णनगरीत सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या भावात (Gold Rate) वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात (Jalgaon Sarafa Bajar) शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 300 रुपयाची वाढ झाली तर चांदीच्या प्रति किलोच्या दरात 590 रुपयाची वाढ झाली. यापूर्वी गुरुवारी सकाळच्या सत्रात सोने 240 तर चांदीच्या दरात 330 रुपयाची वाढ नोंदवण्यात आली होती.

असे आहेत भाव
शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात (Jalgaon Sarafa Bajar) 24 कॅरेट सोन्याचा (24 Carat Gold) भाव 50,100 रुपये प्रति तोळा तर चांदीचा 64,750 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.






सोन्यात वाढली गुंतवणूक
अमेरीकेन महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे. मागणीत वाढ झाल्याने भारतीय सराफ बाजारात (India Gold Market) सोने तेजीत आहेत. जळगाव सराफ बाजारात (Jalgaon Sarafa Bajar) पाच दिवसात सोने 1060 रुपयांनी महागले आहे. तर चांदी तब्बल 2590 रुपयांनी महागली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 200 रुपयापर्यंतची घट दिसून आली तर दुसरीकडे चांदीच्या (silver) भावात 1200 रुपयाची घट झाली आहे मात्र चालू आठवड्यात सोने (gold) आणि चांदी (silver) दरात तेजी दिसून आली. दरम्यान, येणार्‍या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो तर पुढच्या पाच वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर (gold rate) 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेतण


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !