मुक्ताईनगरासह रावेरात हिजाब समर्थनार्थ महिला उतरल्या मैदानात


रावेर/मुक्ताईनगर : कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांमधील मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आल्याने या निर्णयाविरोधात रावेरसह मुक्ताईनगरातील मुस्लिम समाज बांधव व भगिनींतर्फे शुक्रवारी मुक्ताईनगरात तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना तर रावेरात तहसीलदारांना व राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

हा तर महिलावर्गाचा अपमान
मुक्ताईनगरता प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हिजाब विरोध हे नागरीक स्वातंत्र्याचे उल्लंघण आहे. आपला देश हा सर्व जाती-धर्माचा देश असून संविधानात सर्वांना आपल्या मर्जीने जीवन जगण्याचा अधिकार आहे. देशाच्या संविधानात विविध आर्टीकलमध्ये भारतीय नागरीकाला आपल्या धर्म व जातीनुसार स्वतंत्र असून जेव्हा देशाच्या सर्वच स्थानी असलेल्या व्यक्ती आपल्या धर्म, जातीनुसार देशाच्या सर्वच स्थानी बसून धर्माचे पालन करू शकतो व देश चालवू शकतो म्हणजे हा देशाचे संविधानाने दिलेल्या स्वतंत्र आहे. हिजाब हे स्वतःखच्या संरक्षणासाठी परीधान केला जातो मात्र त्याचा विरोध करणे हा महिलावर्गाचा अपमान आहे.

यांची होती उपस्थिती होती
निवेदन देताना मुशीरा बी.शेख चांद चौधरी, मुस्कान बी, मुशीरा बी.शेख मकसुद, अलफीया खान तसेच लुकमान बेपारी, नगरसेवक शेख शकील, अफसर खान, मणियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, आरीफ आझाद, जाफर अली, जुबेर अली, शब्बीर खाटीक, युनूस खान, समद खाटीक, तौकीर अहेमद, अरबाज खान, तबरेज खान, शाहीद शेख, दानिश खान, आबीद शेख, शकील शाह, हुजैफा खान, अहेमद खान, आसीफ शाह, इमरान बागवान आदी समाजबांधव उपस्थित होते.

रावेरात प्रशासनाला निवेदन
रावेर : कर्नाटक राज्यात हिजाब (बुरखा) वर बंदीच्या विरोधात रावेर तालुक्यातील मुस्लिम समाजातर्फे तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात शाळा व कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींच्या हिजाब (बुरखा) परीधान करण्यावर व हिजाब घालून शाळा कॉलेजमध्ये येण्यास मनाई करण्यात आली. हिजाब बंदीबाबत कोणतेही आदेश, पत्रक वा निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भाग्यश्री पाठक, अकीलाबी शे.गयास, शमीम बी.युसूफ खान, सुलताना बी.शे, महेमुद रुखसाना मंजुर मन्यार, अंजूमआरा अ. रफीक फरजान, महेमूद शेख, गयास शेख, गयासोद्दीन काझी, युसूफ खान, इब्राहीम खान रफीक, अ.अजीज, मंजूर शेख कादर, वाजीद खान व्यशीर खान, सैआरीफ सै मोहमंद.आदीच्या निवेदनावर सह्या आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !