कोरोना रुग्ण संख्या घटली : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 15 रुग्ण आढळले
जळगाव : जळगाव जिल्ह्यात जिल्ह्यात शनिवार, 12 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 15 रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या घटल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, एकाच दिवसात 122 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
आतापर्यंत 2590 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 590 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 51 हजार 436 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 48 हजार 514 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर शनिवारी 122 रुग्णांनी कोरोनावर मात केली.





या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 11
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 02
अमळनेर 00
चोपडा 01
पाचोरा 00
भडगाव 01
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 00
भुसावळातील कोरोनावाढीचे हे समोर आले कारण
रेल्वेमुळे देशभरातील प्रवाशांचा भुसावळ शहरासोबत थेट संपर्क येतो. त्यामुळे शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने मुसंडी मारली आहे. तिसर्या लाटेतील पहिल्या रुग्णाला रेल्वेची ट्रॅव्हल हिस्ट्री होती. सध्याच्या अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 50 ते 52 टक्के अॅक्टिव्ह रुग्णांना ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे. त्यापैकी काही रुग्ण रेल्वे संबधीत विभागातील बाधितांच्या संपर्कात आले आहेत. शहरातील दाट लोकवस्ती, नियमांकडे दुर्लक्ष यामुळेही रुग्णसंख्या वाढत आहे.
