जळगावच्या फुले मार्केटमध्ये लाखाच्या रकमेवर डल्ला : आरोपी जाळ्यात
जळगाव : शहरातील ‘फुले मार्केट’ येथील जनरल स्टोअर्स फोडून एक लाख दोन हजार रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरुन नेणार्या संशयीत आरोपी शुभम उर्फ बंटी मोहनलाल पुरोहित (मारवाडी गल्ली, शिवाजी नगर) याला बुधवार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी शहर पोलिसांनी अटक केली.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
विकास प्रकाशलाल मकडिया (33, रा.गणेश नगर, बाबा हरदासराम मंगल कार्यालयाजवळ, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे शहरातील फुले मार्केटमध्ये ‘दृष्टी जनरल सौंदर्यप्रसाधने’ या नावाचे दुकान आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानात ठेवलेल्या ड्राव्हरमधून एक लाख दोन हजार रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरुन नेले होते. हा प्रकार महापालिकेचे सफाई कामगार यांना गुरुवार, 27 जानेवारी रोजी सकाळी सुमारास लक्षात आला. यानंतर जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.





गोपनीय माहितीवरून कारवाई
या गुन्ह्याचा तपास पोलीस कर्मचारी उमेश भांडारकर करीत होते. या गुन्ह्यातील संशयीयत आरोपी हा ममुराबाद रस्त्यावर फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे आणि योगेश इंधाटे यांना मिळाली. त्यानुसार बुधवार, 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता ममुराबाद येथून पोलिसांनी अटक करण्यात आली तर संशयीताकडून चोरीतील 14 हजार रुपये जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय निकुंभ, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, गजानन बडगुजर, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, संतोष खवले, राजकुमार चव्हाण, तेजस मराठे, योगेश इंधाटे, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली.
