मालमत्ता हडप करण्यासाठी ‘त्या’पिता-पूत्रांचा खून
नाशिक : मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित या दोघांच्या मृतदेहांची डीएनए तपासणी केली जाणार आहे. कापडणीस यांच्या पत्नी, मुलीच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत. मोखाडा आणि राजूर पोलिसांनी ओळख न पटल्याने दोन्ही मृतदेह दफन करून ठेवले आहेत. हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले जाणार आहेत. लवकरच ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली.
मालमत्ता हडप करण्यासाठी केली हत्या
कापडणीस पिता-पुत्रांची मालमत्ता हडप करण्यासाठी संशयित राहुल गौतम जगताप याने त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

