पाचशे रुपयांची लाच भोवली : कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात


इंदापूर : पाचशे रुपयांची लाच मागणे इंदापूर पंचायत समितीमधील कनिष्ठ सहाय्यकाच्या अंगलट आले असून पुणे एसीबीने सापळा रचून लाचखोर महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत. अश्विनी गणेश भोंग (36, रा.सरस्वतीनगर, क्रीडा संकूल रोड, इंदापूर) असे लाचखोर महिलेचे नाव आहे.

पंचायत समिती कार्यालयात स्वीकारली लाच
यशवंत घरकुल योजनेतील घरकुल बांधकाम निधीचा चेक देण्याच्या मोबदल्यात लाभार्थीकडे अश्विनी भोंग यांनी पाचशे रुपयांची लाच मागितली होती. भोंग यांनी इंदापूर पंचायत समिती कार्यालयातच लाच स्वीकारताना एसीबीने सापळा यशस्वी केला. 17 फेब्रुवारी 2022 रोजी तक्रारदाराकडे अश्विनी यांनी घरकुलाचा चेक देण्याच्या मोबदल्यात 500 रूपये लाचेची मागणी केल्याने याबाबत पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !