रेकॉर्डवरील गुंडाचा खून : या शहरातील धक्कादायक घटना


सांगली : शहरातील उत्तर शिवाजीनगर परीसरात रेकॉर्डवरील गुंड नवनाथ दिलीप लवटे (26, रा. शिवशंभो चौक, सांगली) या चा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी योगेश दिलीप शिंदे (25, रा. लक्ष्मी मंदिराजवळ, सांगली) या रेकॉर्डवरील संशयीताला विश्रामबाग पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

पूर्ववैमनस्यातून खुनाचा संशय
पूर्ववैमनस्य आणि आर्थिक वादातून या खुनाची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. कॉलेज कॉर्नरजवळ उत्तर शिवाजीनगर येथील दडगे हायस्कूलच्या बोळातील एका कॉफी हाऊससमोर रात्री साडेसातच्या सुमारास हा खुनाचा प्रकार घडला. लवटे याच्या अंगावर आठ वार करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !