Maharashtra Minister Nawab Malik राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक ईडीच्या ताब्यात
भल्या पहाटे चौकशीकामी कारवाई : राज्यात उडाली खळबळ
Maharashtra Minister Nawab Malik मुंबई : ईडीच्या अधिकार्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Maharashtra Minister Nawab Malik) यांना भल्या पहाटे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. कुर्ल्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी नवाब मलिक (Maharashtra Minister Nawab Malik) यांची चौकशी करण्यात येत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पहाटे साडेचार वाजता कारवाई
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक (Maharashtra Minister Nawab Malik) यांच्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिक यांना कारवाईची कल्पना दिल्यानंतर ईडीच्या अधिकार्यांनी सकाळी साडेसात वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात आणले. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजल्यापासून मलिक यांची चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान, नवाब मलिक (Maharashtra Minister Nawab Malik) यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेरही बंदोबस्त वाढण्यात आला आहे.




NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrives at the office of the Enforcement Directorate in Mumbai. Details awaited.
(File photo) pic.twitter.com/vYMmvovKsQ
— ANI (@ANI) February 23, 2022
सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप
काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रे समोर आणत नवाब मलिक (Maharashtra Minister Nawab Malik) यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींसोबत व्यवहार केल्याचा आरोप केला होता. आता त्या आरोपांबाबतच्या चौकशीसाठीच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.