नाशिकमधील युवतीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार !


Nashik Rape नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन नाशिक रोड भागातील एका युवतीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी संशयीत आरोपी वैभव भाऊसाहेब शेजवळ (23, रा.गोल्डन स्टार अपार्टमेंट, कलानगर, दिंडोरी रोड, म्हसरूळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लग्नाच्या आमिषाने अत्याचाराचा आरोप
पीडित युवती ही नाशिकरोड (nashik road) परीसरातील एका भागातील रहिवासी असून संशयीत आरोपी वैभवने ओळख वाढवून जवळीक वाढवल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले व आरोपीने लग्न करण्याचे आमिष दाखवून मुंबई नाक्यावरील ओयो हॉटेल, शालिमार येथील पूजा हॉटेल व अंबड येथील ओयो हॉटेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार केल्याचा आरोप पीडीतेने केला आहे.





फसवणूक झाल्याने दाखल केला गुन्हा
14 फेब्रुवारी 2020 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यानच्या कालावधीत पीडीतेवर अत्याचार करण्याचा आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपी वैभव शेजवळ याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गीते करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !