खाद्य तेलाचा टँकर उलटताच ग्रामस्थांच्या पडल्या उड्या
शिंदखेडा : अपघात घडल्यानंतर अनेक विचित्र अनुभवाची प्रचिती येत असते. अशीच प्रचिती खाद्य तेलाचा टँकर उलटल्यानंतर आली. ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांद्वारे खाद्यतेल मिळवण्याचा प्रयत्न केला. कॅन, बादली-बाटली तर काहींनी छोटा ड्रम आणून तेल वाहून नेल्याचा प्रकार धुळे तालुक्यता घडला.
धडकेमुळे उलटले तेलाचे टँकर
धुळ्यातून सोयाबीन तेल घेवून निघालेले टँकर (एम. एच.18,डी 7166 घेवून चालक अमरीकसिंग जोगिंदरसिंग गोराख (रा.पंजाबी कॉलनी, मोहाडी) दराणे शिवारातून जात असताना भरधाव डंपर (क्र.एन. एल. 01, ए. ई. 0294 ) ने धडक दिल्याने तेलाची वाहतूक करणारा टँकर रस्त्याला लागून असलेल्या एका शेतात जाऊन उलटला. अपघातानंतर टँकरमधील तेलाला गळती लागताच ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांद्वारे तेल वाहून नेले.

संतापजनक : अल्पवयीन मुलीवर मंदिरातच अत्याचार

