शेतीपूरक व्यवसायाशिवाय शेतीत क्रांती अशक्य : अनिल भोकरे


साकळी : अलीकडच्या काळात हवामानात मोठे बदल झाल्यामुळे शेती व्यवसाय पूर्णपणे संकटात आला आहे. तथापि शेती व्यवसाय उज्ज्वल करण्यासाठी शेती पूरक व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही. शेतीच्या शाश्वत प्रगतीसाठी पोखराच्या अनुषंगाने काम करा. पारंपरीक शेती निश्चित करा पण कमी खर्चात शेतीत वेगळे प्रयोग कराल तेव्हाच शेती फायदेशीर राहील, असे प्रतिपादन कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी नेवे फार्मर प्रोड्यूसर कंपनी तर्फे आयोजित शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेत केले. त्यांनी शेतकर्‍यांना अतिशय मार्मिकपणे मार्गदर्शन केले.

साकळी पीक सोसायटीत कार्यशाळा
साकळी, ता.यावल येथे 3 रोजी पीक संरक्षण सोसायटीच्या सभागृहात सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे अध्यक्षस्थानी होते. तंत्र सहाय्यक संजय पवार (जळगाव), यावल तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे आदी मान्यवर मार्गदर्शक अधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर जेडीसीसी बँकेचे संचालक विनोद पाटील, मंडळ अधिकारी अजय खैरनार, यावल, साकळी आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक विवेक यावले, जितेंद्र नेवे (छोटू बाबा), सय्यद अहमद सय्यद मीरा, मोहसीनखान हाजी आसीफखान, रवींद्रसिंग यादव, हितेंद्र चौधरी, प्रमोद सोळंके, किरण महाजन, श्याम महाजन, दीपक महाजन, सेवानिवृत्त कृषी सहाय्यक एम.एन.खंबायत हे प्रमुख अतिथी होते. नेवे फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सीईओ विलास नेवे यांनी प्रास्ताविक केले. युवा शेतकरी तथा रेशीम उद्योजक दीपक महाजन व जगदीश पाटील तसेच कुक्कुटपालक व पशुखाद्य निर्मितीचे उद्योजक गणेश माळी यांचाही विशेष गौरव करण्यात आला. आभार स्वयंदीप प्रतिष्ठानचे संचालक संदीप पाटील (डांभुर्णी) यांनी मानले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
उपक्रम यशस्वीतेसाठी नेवे फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सीईओ विलास नेवे यांच्यासह श्रीधर चौधरी, जगन्नाथ नेवे, पल्लवी पाटील, अनिता वाणी, सविता तायडे, दीपक महाजन, मयूर नेवे, सुनीता दलाल, अश्विनी पाटील, दिव्या पवार, गणेश पाटील या कंपनीच्या पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !