भुसावळात आनंद नगरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोटरी क्लब ऑफ, भुसावळ, माहेश्वरी महिला मंडळ व इनरव्हील क्लब ब्लॉसमतर्फे आयोज
भुसावळ : शहरातील प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलच्या प्रांगणात नुकतेच आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन रोटरी क्लब ऑफ भुसावळ तसेच माहेश्वरी महिला मंडळ व इनरव्हील क्लब ब्लॉसम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. भुसावळकरांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे व डॉ.संगीता बियाणी, रजनी सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.
खवैय्यांसाठी खास मेनू
दुसर्या दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.रश्मी शर्मा (पास्ट एसोसिएशन प्रेसिडेंट ऑफ इनरव्हील), रत्नकांता अग्रवाल, (पास्ट डिस्ट्रिक्ट चेयरमन डिस्ट्रिक्ट 303), राधा झंवर (जळगाव जिल्हा माहेश्वरी महिला संगठन अध्यक्षा) यांच्याहस्ते करण्यात आले. या मेळाव्यात खास खवैयासाठी गावरान तडका म्हणून ग्रामीण भागातील विविध प्रकारचे व्यंजन त्यात उडीद वडे, 1एधनी, भरीत भाकरी, मेथी पराठे, लाल चटणी, पाणीपुरी उपलब्ध करून देण्यात आली तसेच महिलांसाठी कटलरी साहित्यासह ज्वेलरी, कपडे, योग मार्गदर्शन तसेच अनेक प्रकारचे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले.
यांचे उपक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम
उपक्रमाची मूळ संकल्पना व नियोजन शीतल भराडिया यांची होती. मेळाव्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन दिलीप खंडेलवाल, महेश भराडे, राजेश जोशी, राजेश ए.अग्रवाल, प्रा.प्रदीप दवे, अनंता पाटील, गजानन ठाकुर यांनी परीश्रम घेतले. इनरव्हील क्लब अध्यक्षा तृप्ती नगोरी, माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा चित्रा झंवर, सचिव दीपा झंवर, शुभांगी हेडा, पद्मजा दरगड, शशिकला लाहोटी यांनी कार्यक्रम मांडणी केली. गावरानी तडकासाठी जयश्री दवे यांनी बचत गटांना प्रवृत्त केले तर रोटरी क्लब ऑफ भुसावळचे प्रेसिडेंट राजेंद्रकुमार फेगडे व सेक्रेटरी राजेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.


