भुसावळात शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांचे आज व्याख्यान
भुसावळ : शिवव्याख्याते व साहित्यीक अमोल मिटकरी यांचे शहरातील डी.एस.हायस्कूलच्या मैदानावर रविवार, 12 रोजी रात्री आठ वाजता व्याख्यान होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता अंकुश हुसळे व सहकारी भीम गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत.
यांची कार्यक्रमास राहणार उपस्थिती
कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, जयपाल बोदडे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, रवी सपकाळे आदींची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक प्रकाशभाई तायडे, पप्पू सुरडकर व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले आहे.


-
भुसावळ शहर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शरद सोनवणे
-
शस्त्र तस्कर पकडले : भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षकांसह कर्मचार्यांचा आयजींनी केला सन्मान
