रावेर बाजार समिती सभापती दिलीप पाटलांचा राजीनामा
रावेर : बाजार समितीचे सभापती दिलीप पाटील व उपसभापती कैलास सरोदे यांनी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला आहे. या रीक्त जागांवर सभापतीपदी भाजपाचे श्रीकांत महाजन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. बाजार समितीच्या सभापतीपद काँग्रेस तर उपसभापतीपद भाजपकडे होते. ठरल्याप्रमाणे दोन्ही पदाधिकार्यांनी राजीनामा दिला . भाजपाचे सभापती तर काँग्रेसचे उपसभापती निवडले जाणार आहेत. तांदलवाडीचे सरपंच श्रीकांत महाजन यांची सभापती पदावर तर उस्मान तडवी यांची उपसभापती पदावर निवड होऊ शकते. या वृत्तास सचिव गोपाळ महाजन यांनी दुजोरा दिला.
