भुसावळ शहर व ग्रामीणमधील रस्त्यांची कामे मार्गी लावणार -आमदार सावकारे


भुसावळ : भुसावळ विधानसभेच्या निवडणुकीत सलग तिसर्‍यांदा जनतेने निवडून दिल्याने आपण जनतेचे आभारी आहोत, निवडणुकीत दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करण्याची आता आपली जवाबदारी असून शहरातील रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे आता लवकरच मार्गी लागतील, असा विश्‍वास आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, शहरात मंजूर झालेल्या ग्रामीण रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटर लवकरच सुरू होणार असून शासनाकडे आता पदे मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. भुसावळातील क्रीडा संकुलासाठी सात कोटी 62 लाखांचा निधी मंजूर झाला असून त्या संदर्भात विविध कामे करण्यासाठी आता टेंडर प्रक्रियेला गती देण्यात येईल शिवाय शहर व तालुक्यातील मतदारांना निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आपण बांधील असून सर्वात आधी नागरीकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यावर भर असेल, असेही ते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !