मद्यपी ट्रक चालकाच्या धडकेत टेम्पो उलटला : एक जण जखमी


यावल : मद्यपी ट्रकवरील चालकाने टेम्पोला जबर धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात टेम्पो उलटून एक जण जखमी झाला. हा अपघात अंकलेश्वर- बर्‍हाणपूर राज्यमार्गावरील चुंचाळे फाट्याजवळ शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.

टेम्पो उलटल्याने सेल्समन जखमी
वाहन चालक योगेश राजकुमार तलरेजा (मणेश नगर, जळगाव) हे सेल्समन सादिक गफ्फार पिंजारी (38, रा.मेहरुण, जळगाव) यांच्यासह टेम्पो (एम.एच. 19 सी.वाय. 4733) घेवून यावलकडे येत असताना ट्रक (क्रमांक जी.जे. 31 टी.3307) वरील चालक धीरजसिंग रामजसिंग (रा.चांदणी चौक, भिलानी, छत्तीसगड) याने मद्याच्या नशेत टेम्पोला पाठीमागील बाजूने धडक दिली. या धडकेत फुटबॉल प्रमाणे टेम्पो रस्त्याच्या कडेला जावून उलटल्याने सेल्समन पिंजारी यांचा पायाला दुखापत झाली तर अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला मात्र त्यास यावल शहरात पकडण्यात आल्यानंतर यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !