मुक्ताईनगरात विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा
मुक्ताईनगर : सरकारी नोकरदारांच्या पदोन्नतीतील रखडवलेले आरक्षण सुरू करावे, 2005 नंतर सरकारी नोकरीस लागलेल्या सरकारी कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, देश आणि राज्य पातळीवर गेल्या 72 वर्षात अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त जातींसाठी असलेला सरकारी उत्पन्नाच्या 22 टक्के अनुशेष असलेला थकित निधी परत करावा यासह विविध न्याय मागण्यांसाठी सर्व मागासवर्गीय संवैधानिक संघर्ष समिती मुक्ताईनगरच्या वतीने रविवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
तहसीलदार दालनात चिटकवले निवेदन
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकापासून मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील विविध भागातून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर मोर्चेकरी तहसील कार्यालयात आले मात्र यावेळी प्रशासनातर्फे कुणीही उपस्थित नसल्याने तहसील कार्यालयाच्या 1बंद दरवाजावर निवेदन डकवण्यात आले व तहसीलदारांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण केला व प्रशासनातील भेदभावपूर्ण जातीय विषमतेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. पक्षपाती अधिकार्यांच्या जातीय भेदभावाविरुद्ध राज्याच्या मुख्य सचिवांकडे कायदेशीर तक्रार करण्यात येणार आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर अॅड.मनोहर खैरनार, अॅड.एस.एम. तायडे, लक्ष्मण भालेराव, जनार्दन सुरवाडे, अर्जुन इंगळे, अक्षय चौधरी, दिलीप खंडारे, भास्कर ससाने, जयपाल इंगळे, महिंद्र पानपाटील, अरुण रायपुरे, नामदेव खंडारे, बाळकृष्ण वाघ, रवींद्र तायडे, रेखा सावळे, गीताबाई बोदडे, पूजा तायडे, जरीना बी.मन्यार, येडाबाई तायडे, सुनंदा मेढे, जकिरा बी.हमीदाबी अहमद, पंचफुला वाघमारे, जनार्दन थाटे, भागवत इंगळे आदींसह सुमारे 100 नागरीकांच्या स्वाक्षर्या आहेत.


