आदिवासी ग्रामविकास मंडळाची नायगावात स्थापना
यावल : तालुक्यातील नायगाव येथे आदिवासी समाजातील विधवा व निराधार महिलांना नुकत्याच साड्या वाटप करण्यात आल्या. तळागाळातील आपल्या बांधवांना शैक्षणिक आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासह तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी यावेळी आदिवासी ग्रामविकास मंडळाची स्थापना करण्यात आली. कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने दिलदार कासम तडवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी नासेर तडवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत बारेला यांच्यासह समिती सदस्य तथा आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष अनिल तडवी, यावलच्या माजी नगराध्यक्षा नौशाद तडवी, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, समाजसेविका मीना तडवी , नायगाव सरपंच शरीफा तडवी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सदस्य जफरूल्लाह जमादार, ठाणे महानगरपालिकेचे स्वछता निरीक्षक यासीन तडवी, इरफान तडवी (मुक्ताईनगर), मुबारक तडवी उपस्थित होते.
यांचे कार्यक्रमासाठी विशेष परीश्रम
सूत्रसंचालन समीर तडवी आणि जाहबीर तडवी यांनी तर प्रस्तावना मेहेरबान तडवी यांनी केली. यशस्वीतेसाठी लुकमान तडवी, संस्थापक अध्यक्ष फकिरा तडवी, समीर तडवी, महेंद्र सोळुंके, मेहेरबान रहिमान तडवी, रहिमान तडवी, तुकडू तडवी, कलिंदर तडवी, कुर्बान तडवी, कलिंदर तडवी, सिराज तडवी, वजीर तडवी, सुपडू तडवी, नथू तडवी, सलीम सायबू तडवी, रुबाब बाबू तडवी, मेहरबान तडवी, राजू तडवी, रफीक तडवी यांनी परीश्रम घेतले.


