भुसावळातील बारागाड्या दुर्घटना : मृतावर अंत्यसंस्कार

भुसावळातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे शवविच्छेदन होण्यास दिरंगाई : वाद मिटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरज ः यावल शहरात मृतदेहावर शवविच्छेदन


भुसावळ : भुसावळात मरीमाता यात्रोत्सवानिमित्त ओढण्यात आलेल्या बारागाड्या ओढताना अनियंत्रीत होवून भाविकाचा मृत्यू झाल्याची तर अन्य चौघे भाविक जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. नववर्षाच्या प्रारंभालाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पाच वर्षांच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला होता. दरम्यान, मृत गिरीश कोल्हे यांच्या मृतदेहावर भुसावळ ट्रामा केअरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुर चौधरी यांनी यावल येथे शवविच्छेदन केले. भुसावळातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे शवविच्छेदन होण्यास दिरंगाई होत असल्याने सुज्ञ लोकप्रतिनिधींनी आता पुढाकार घेवून तिढा मिटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पहेलवानाच्या सतर्कतेने अनर्थ टळला
सूत्रांच्या माहितीनुसार, बारागाड्यांपैकी पहिल्याच गाडीच्या दुस्सरवर पहिलवान आकाश संजय पाटील हा जुने सतारेतील तरुण बसला होता. त्याने प्रसंगावधान राखून गाड्या नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अन्यथा वेगवान गाड्या दुभाजक ओलांडून पलिकडे सरदार वल्लभभाई पुतळ्याजवळ उभ्या भाविकांच्या अंगावर धडकून मोठी जीवितहानी झाली असती ! सन 2018 मध्ये भुसावळ शहर पोलिस दलातील कर्मचारी रमेश सौंदाणे-कुंभार यांचा बारागाड्या आल्याने मृत्यू झाला होता व पुन्हा 2022 मध्ये घडलेल्या घटनेने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

कुरघोड्यांमुळे भुसावळात शवविच्छेदनाला ‘खो’
पालिकेच्या श्री संत गाडगेबाबा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकिय अधिकार्‍यांकडून मृतदेहावर शवविच्छेदन केले जात होते मात्र गेल्या महिन्यात ग्रामीण रुग्णालय व पालिका रुग्णालय अधिकार्‍यांमध्ये पीएम रुमला कुलूप लावण्यावरुन वाद निर्माण झाल्याने सेवा खोळंबली आहे तर तब्बल दहा वर्षानंतर शहरात शवविच्छेदन सुरू झाले असताही केवळ कुरघोड्यांमुळे मृताच्या नातेवाईकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. विशेष बाबत म्हणजे गिरीष कोल्हे यांचा मृतदेह रात्री पालिका रुग्णालयात हलविण्यात आला असता शवविच्छेदन गृहातील वीजपुरवठा खंडित असल्याने आश्चर्य व्यक्त झाले. पालिका रुग्णालयात वीजपुरवठा सुरू असताना नेमका शवविच्छेदन गृहातील पुरवठा खंडीत का झाला व कुणी केला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मृत पीठ गिरणी चालकावर अंत्यसंस्कार
बारागाड्या दुर्घटनेत मृत झालेल्या गिरीश कोल्हे या अविवाहित तरुणावर रविवारी दुपारी 12 वाजता शोकाकुल वातावरणा अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हे यांचा पीठ गिरणीचा व्यवसाय होता. गेल्या वर्षी त्यांच्या भावाने कोरोनामुळे निधन झाले. त्यांच पश्चात आई-वडील आहेत.

एका भाविकाचा मृत्यू : चौघे गंभीर
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जुना सातारा भागातील मरीमातेची यात्रा व बारागाड्या उत्सव झाला नव्हता. यंदा हा उत्सव साजरा होणार असल्याने शनिवारी सायंकाळी जळगाव रोडवर गुरुद्वारापासून ते जुने सतारेपर्यंत भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. नियोजनानुसार पूजाविधी होऊन सायंकाळी 7 वाजता जळगाव रोडवरील गुरुद्वारा पासून बारागाड्या ओढण्यास सुरूवात झाली. यानंतर अवघ्या तीन मिनिटांत गाड्या जुने सतारे चौकात पोहोचल्या. यावेळी बारागाड्या अनियंत्रीत झाल्याने भाविक गिरीश रमेश कोल्हे (42, रा.सुतार गल्ली, जळगाव रोड, भुसावळ) यांच्या पोट व डोक्यावरुन चाक केल्याने त्यांचा मृत्यू झाला तर बारागाड्या लोटणारे भाविक छोटू उत्तम इंगळे (33, रा.कोळीवाडा, भुसावळ), धर्मराज देवराम कोळी (63, रा.जुने सतारे, मरीमाता मंदिराजवळ, भुसावळ), मुकेश यशवंत पाटील (28, रा.खळवाडी, भुसावळ), शिक्षक नितीन सदाशिव फेगडे (53, रा.गणेश कॉलनी, भुसावळ) हे भाविक गाडीखाली आल्याने जखमी झाले. या दुर्घटनेनंतर यात्रोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले.

पवन एक्स्प्रेसला अपघात : जय नगरसाठी पर्यायी रेल्वेने प्रवासी रवाना 

पोलिसांचा बंदोबस्त फेल
जळगाव रोडवर बारागाड्या ओढल्या जाताना रस्ता दुभाजकाच्या एकाच बाजूने अधिक गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रणासाठी तोकडा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने गर्दी बाजूला करताना स्थानिक माजी नगरसेवकांसह काही युवा कार्यकर्तेच मेहनत घेताना दिसून आले मात्र गर्दी बाजूला सारण्यासाठी देखील पोलिसांची मदत झाली नाही. कदाचित गर्दीवर नियंत्रण असते तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशीही चर्चा ऐकायला मिळाली.

नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसला अपघात : आठ रेल्वे गाड्या रद्द ; चार गाड्यांचे मार्ग बदलले




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !