आरटीओची कारवाई ; यंदा 12 हजार वाहनचालकांवर गुन्हे दाखल
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 90% जास्त दंड वसूल
जळगाव : उपप्रादेशिक परीवहन विभागाच्या वायुवेग पथकाने वाहतूक नियमांचा भंग करणार्या वाहनचालकांकडून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 90 टक्के जास्त दंड वसुली केली आहे. 2020-21 मध्ये या पथकाने तडजोड शुल्क व थकीत कराची 4.81 कोटींची वसुली केली होती. त्या तुलनेत 2021-22 मध्ये 5.11 कोटी दंड तर 2.34 कोटी थकीत वाहन कर वसुली केली आहे. तर 12 हजार 42 दोषी वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील विविध कलमाखाली गुन्हे नोंदवले आहे.
अशी झाली कारवाई
अवैध प्रवासी वाहतूक 1461 वाहनधारक, नियमबाह्य खासगी बसधारक 139, योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेले 1695 वाहनधारक, हेल्मेट न वापरणारे 1778 दुचाकीस्वार, मोबाइलवर बोलणारे 307 दुचाकीस्वार, सीट बेल्ट न लावणारे 243 कारचालक, दोषी रिक्षाचालक 708, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक 401, रिफ्लेक्टर नसणारे 1227, 522 वेगाने वाहन चालवणार्याविरुद्ध गुन्हा नोंद केल्याची माहिती आरटीओ श्याम लोही यांनी दिली आहे.
