भुसावळात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
87 प्रकरणांचा निपटारा : अभियानात विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वाटप
Spontaneous Response to the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Grievance Redressal Camp in Bhusawal भुसावळ (14 मे 2026) : शासन निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान-टप्पा 1 अंतर्गत भुसावळ मंडळस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 87 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहातील शिबिरात प्रसंगी विविध शासकीय योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे होते. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच प्रांत जितेंद्र पाटील यांच्याहस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. शासनाच्या विविध विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण, नागरिकांच्या तक्रारी तत्काळ निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी,विद्यार्थी आणि महिलांना या शिबिराचा मोठा लाभ झाला. शिबिरात जात प्रमाणपत्र 17, रहिवास प्रमाणपत्र 26, उत्पन्न प्रमाणपत्र 67, नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र 26, नवीन रेशन कार्ड 104, संजय गांधी योजना मंजूर प्रकरणे 84, वारस फेरफार 43, अ.पा.क. शेरा कमी करणे 5 तसेच माझा 7/12 अचूक 7/12’ अंतर्गत 87 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. याशिवाय पंचायत समिती, आरोग्य विभाग, नगर पालिका भुसावळ, भूमी अभिलेख कार्यालय तसेच तालुका कृषी कार्यालय यांच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले.








