यावल शेत-शिवारात अचानक आग


यावल : रविवारी दुपारी यावल येथील शेतकरी गोपाळ पाटील, संजय पाटील आणि दिलीप पाटील यांच्या शेती शिवारात अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच, प्रहार जनशक्ति पक्षाचे शहरअध्यक्ष तुकाराम बारी यांनी तात्काळ नगरपालिका गाठत अग्निशमन दलाच्या मदतीने घटनास्थळी दाखल झाले. आणि तातडीने लागलेल्या आगेवर अग्निशमन पथकाच्या मदतीने नियंत्रण मिळवले. त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष तुकाराम बारी सोबत गोपाळ पाटील,संजय पाटील, दिलीप पाटील कुंदन बारी, प्रतीक बारी,सागर बारी आदींनी परिश्रम घेतले. एकूणच प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी अशा पद्धतीने तत्परता दाखवत केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !