खरीप हंगामात पीक कर्जाच्या वाढीव तरतुदी करा : आमदार चंद्रकांत पाटील
मुक्ताईनगर : आगामी खरीप हंगामात पीक कर्जाच्या वाढीव तरतुदी कराव्यात, पीक विम्याच्या रकमा तत्काळ अदा कराव्याते, के.सी.सी अकाऊंट क्लिअर करावे तसेच शेतकर्यांच्या सोयी सुविधांसाठी अंतुर्ली व कुर्हा येथे राष्ट्रीयकृत असलेल्या स्टेट बँकेच्या शाखांची निर्मिती करावी आदी विषयांबाबत संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांशी चर्चा आमदार चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली. सेंट्रल बँक आणि भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांच्या अनेक अडचणी लक्षात अनेक प्रश्नही त्यांनी मांडत याबाबत बँकेच्या रीजनल मॅनेजर यांच्याशीही संवाद साधला.
शहाद्यात उद्यापासून ‘युवारंग’ महोत्सवाची धूम
असुविधांमुळे ग्राहकांना मनस्ताप
मुक्ताईनगर तालुका हा 83 गावांचा समावेश असलेला तालुका आहे. तालुक्यात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने असल्याने पीक कर्ज, के.सी.सी.व इतर शेती विषयक कर्ज यांचे सेंट्रल बँकेत 35 हजार खातेदार आहेत तर स्टेट बँकेत 22 हजार खातेदार आहेत. दोन्ही बँकेत इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या खातेदार ग्राहक असतानाही तोकड्या कर्मचार्यांवर त्याचा ताण पडतो शिवाय त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. शेतकरी वर्गाला तसेच बँकेच्या खातेदारांना व्यवहार करताना अनेक अडचणी येत असून तत्काळ वाढीव कर्मचार्यांची संख्या वाढवावी आणि अंतुली व कुर्हा येथे नव्याने बँकेच्या शाखांची निर्मिती करावी तसेच येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज, पाईप लाईन कर्ज व इतर शेती विषयक कर्ज योजनांची तरतूद करावी, अतिरिक्त ग्राहक सेवा केंद्राची निर्मिती करण्यात यावी आदी विविध विषयांवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी शाखा व्यवस्थापकांशी चर्चा केली तसेच बँकेच्या वरीष्ठ अधिकार्यांशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करून महत्वपूर्ण सूचना देखील केल्या.

चाळीसगावात 13 लाखांचा गांजा जप्त : दोघांना अटक
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना विभागप्रमुख महेंद्र मोंढाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, स्वीय सहायक प्रशांत पाटील, संचालाल वाघ, दशरथ पाटील, उमेश पाटील, नितीन पाटील, दिलीप पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.