सिलिंडरच्या नळीने पेट घेतल्याने यावलमधील प्रौढ जखमी
यावल : शहरातील देशमुखवाडा भागातील रहिवासी घनश्याम भागवत चौधरी (41) हे बुधवारी सकाळी स्वयंपाक घरात असतानाच अचानक सिलेंडरची नळी निघताच तिने पेट घेतला. ही नळी थेट धनश्याम चौधरी यांच्या पायावर आल्याने त्यांचे दोन्ही पाय भाजले. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने गॅस बंद करण्यात आला तर जखमी अवस्थेतील घनश्याम चौधरी यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ.शुभम तिडके, अधिपरीचारीका शीतल ठोंबरे, बापू महाजन, सुमन राऊत, विजय शिंदे आदींनी प्रथमोपचार केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.