जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत भुसावळचा महाबली संघ विजयी


भुसावळ : जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्रीरामराज्य फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय 70 किलो वजनी गट स्कायनेट कबड्डी स्पर्धा 2022 चा समारोप झाला. जामनेर, जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, रावेर, सावदा, एरंडोल या तालुक्यातील 22 संघानी स्पर्धेत सहभाग नोंदविला. भुसावळच्या महाबली क्रीडा प्रसारक मंडळाने जळगावच्या क्रीडा रसिक मंडळाचा अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अवघ्या 10 गुणांनी पराभव केला. ओम साई विखरण एरंडोलचा संघ तृतीय ठरला. महाबली क्रीडा मंडळाच्या या अजिंक्यपदामुळे भुसावळ शहरास अवघ्या दहा वर्षानंतर हा मान मिळाला आहे.

हा तर भुसावळचा विजय
संकेत माने, निलेश इसाळगे, टीकाराम पाटील यांनी संघाला प्रशिक्षण देऊन संघाला मजबूत बनवले, हा विजय महाबली क्रीडा प्रसारक मंडळाचा नसून भुसावळ शहराचा आहे असे प्रतिपादन महाबली क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप महाजन यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांनी केले. जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नितीन बरडे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रा.उत्तम सुरवाडे, अनिकेत पाटील, विशाल ठोके, गब्बर चावरिया, गिरीष महाजन, विशाल जंगले उपस्थित होते. पारीतोषिक वितरण सतीश सपकाळे, अभिजीत मराठे, पवन ढंढोरे, भागवत पाटील, संजय संसारे, रमेश भोई, सागर वाघोदे, बाळासाहेब भोई यांच्याहस्ते करण्यात आले.


यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वीतेसाठी श्री रामराज्य फाउंडेशनचे उपाध्यक्ष पवन ढंढोरे, सचिव प्रा.धीरज पाटील, शुभम कोळी, गौरव परदेशी, अमोल पाटील, कैलास पाटील, विशाल सपकाळे, विजय ढंढोरे, दीपेश भोई, अमोल झटकार, नितीन झांबरे, सागर कोळी, यश बविस्कार, संदीप भोई, चंदन भोई, गिरीश राणे, सूरज चौधरी, अमर खरारे, ऋतिक कोळी व महाबली क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !