भुसावळात अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला मदत
भुसावळ- कला, विज्ञान व पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी नेहा शिवनाथ विश्वकर्मा हिचा 2 नोव्हेंबर रोजी नाहाटा चौफुलीवर अपघात झाला होता. या विद्यार्थिनीची आर्थिक परीस्थिती नाजूक असल्यामुळे, मानवीय दृषटिकोनातून तिला वैद्यकीय खर्चात मदत म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्फत 21 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. प्राचार्य मार्फत आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. अपघातग्रस्त विद्यार्थिनीचे वडिल शिवनाथ विश्वकर्मा यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे, महाविद्यालयाच्या रजिस्टार रेखा बर्हाटे, कार्यालय अधीक्षक भगवान तायडे, श्रावण न्हावकर, प्रा.अनिल हिवाळे आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत देण्यात आली. दरम्यान, अपघातग्रस्त विद्यार्थिनीच्या वर्ग मित्र-मैत्रीणीनीं आणि इतर विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने, विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांकडून वैयक्तिकरीत्या फिरूनन मदत जमा केली.
