मोबाईल शॉपीमधून चोरट्यांनी 52 लाखांचे महागडे मोबाईल लांबवले


पुणे : सोमवार पेठेतील एका मोबाईल दुकानाची थेट भिंत फोडून चोरटयांनी तब्बल 52 लाख 30 हजार रुपये किंमतीचे तब्बल 307 मोबाईल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोमवार पेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

महागडे 307 मोबाईल लंपास
सोमवार पेठेतील अपोलो चित्रपटगृह चौकाजवळच्या कुमार सधन नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये खुराणा सेल्स मोबाइल शॉपी नावाचे दुकान आहे. दुकानाचे मालक नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्रीसाडे नउ वाजता दुकान बंद केले. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता दुकान उघडले, तेव्हा दुकानामध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. दुकानातील 52 लाख 30 हजार रुपये किंमतीचे तब्बल 307 मोबाईल चोरून नेले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !