वैयक्तिक शौचालय योजनेत दिड कोटींचा अपहार : दोघे कर्मचारी कार्यमुक्त


जळगाव : तब्बल दीड कोटी रुपयांचा अपहार रावेर तालुक्यात पंचायत समितीमार्फत राबवण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेत उघड झाला होता. या प्रकरणी गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कंत्राटी कामगार असलेल्या दोघांची सेवा समाप्त करत कार्यमुक्त केले आहे.

25 वर्षीय तरुणाची आत्महत्या : कुसुंबा गावातील घटना

जिल्ह्यातील योजनांची व्हावी चौकशी
राावेर तालुक्यात राबवलेल्या वैयक्तिक शौचालय अनुदान योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी त्रीदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात प्रथम दर्शनी एक कोटी 52 लाख 64 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे दिसून आले त्यामुळे गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तर त्यांना आता सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी राबवण्यात आलेल्या या योजनांची चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.


बोदवड शहरातील मिरची कांडप कारखान्याला आग : 30 लाखांचे नुकसान 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !