वरणगावात भारनियमन रद्दसाठी भाजपाचे ‘ठिय्या’ आंदोलन

वरणगावकरांचे विस्कळीत पाणीपुरवठ्याने हाल : 29 रोजी भाजपाचे जनआंदोलन


वरणगाव : वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरील जॅकवेल कठोरा येथे मोठ्या प्रमाणावर वीज कंपनीकडून होणार्‍या भारनियमनामुळे शहराला तब्बल 15 दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांचे ऐन उन्हाळ्यात हाल होत असून महिलावर्गाची पाण्यासाठी भटकंती होत आहे. कठोरा येथील जॅकवेलवरील भारनियमन बंद करावे, दीपनगर येथून 24 तास वीजपुरवठा होईल, अशी वीज वाहिनी कठोरापर्यंत टाकावी अथवा एक्सप्रेस फिडर बसविण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी सकाळी वरणगावातील महा वितरण कंपनीच्या वरणगाव सबडिव्हीजन कार्यालयावर ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली.

यांनी केले आंदोलन
भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, सुनील माळी, आकाश निमकर, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, गोलू राणे, साबीर कुरेशी, दीपक चौधरी, मयूर गावंडे, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, भीमराव कंखरे, भाजयुमो उपाध्यक्ष पप्पू ठाकरे, रामभाऊ माळी, अशोक पाटील, बळीराम सोनवणे, माणिक कोळी, गणेश चौधरी, किसान मोर्चाचे ऋषिकेश महाजन यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.


भाजपाचे 29 रोजी जनआंदोलन
आंदोलनादरम्यान वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरील जॅकवेल कठोरा योजनेवरील भारनियमन तातडीने रद्द करण्याच्या मागण्यांबाबत घोषणाबाजी करण्यात आली तसेच महाविकास आघाडीचा धिक्कार असो, अश्या घोषणा देण्यात आल्या. या मागण्यांसंदर्भात शुक्रवार, 29 एप्रिल पासून मोठे जनआंदोलन करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.

भर उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल
आधीच तापमानाचा पारा 46 अंशावर पोहोचला असून त्यातच सततच्या भारनियमनामुळे वरणगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरवासीयांना तब्बल 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. महिलांसह आबालवृद्धांना पाणी आणण्यासाठी रणरणत्या उन्हातही भटकंती करावी लागत आहे. या प्रकारांना पायबंद बसण्यासाठी पाणीपुरवठा योजनेवरील भारनियमन रद्द करावी, अशी मागणी होत आहे.

विवाहितेवर नराधमांनी सामूहिक अत्याचार करीत केली हत्या 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !